ठाणे : कळव्यातील हत्ये प्रकरणी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कळवा नाका जवळच्या विश्व कर्मानगर येथे राहणारा संभाजी पांडुरंग धनेश्वर व कळवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या राहुल कदम आणि कुणाल वाघ यांच्याबरोबर मध्यरात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर जुन्या भांडणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा रागातून राहुल व कुणाल याने संभाजी याला डोक्यात दगड घालून व गळा आवळून त्याची हत्या केली होती व ते पसार झाले होते.

कळवा : कळवा विश्वकर्मा नगरमध्ये जुन्या भांडणातील रागातुन 23 जुलै रोजी मध्यरात्री येथील फुटपाथवर दोघा तरुणांनी एकाची दगड घालून केलेल्या हत्येप्रकरणी कळवा पोलिसांनी शुक्रवार (दि 11) ला रात्री कळवा रेल्वे कॉलनी येथून एकाला अटक केली. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे, त्याचा कळवा पोलीस शोध घेत आहेत.

कळवा नाका जवळच्या विश्व कर्मानगर येथे राहणारा संभाजी पांडुरंग धनेश्वर व कळवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या राहुल कदम आणि कुणाल वाघ यांच्याबरोबर मध्यरात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर जुन्या भांडणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा रागातून राहुल व कुणाल याने संभाजी याला डोक्यात दगड घालून व गळा आवळून त्याची हत्या केली होती व ते पसार झाले होते. फूट पथावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या संभाजी विषयी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस हवालदार प्रशांत पवार यांना मिळाली होती. त्यांनी त्याला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

त्या संदर्भात कळवा पोलिसात शुक्रवारी (दि 11) ला सकाळी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कळवा पोलिस या आरोपींचा शोध घेत होते त्या नुसार त्यातील कुणाल वाघ याला शुक्रवारी रात्री कळवा पोलिसांनी रेल्वेकॉलनी मधून अटक केली असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे. तर राहुल कदम हा फरार झाला आहे त्याचा कळवा पोलिस शोध घेत आहेत. या संदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे पो उपनिरीक्षक डी. वाय. शेलार अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: Thane news on arrested for murder case