जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीचीही चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

ठाणे - अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी व अभिनेत्री आयशा श्रॉफ यांना सीडीआरप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सीडीआरप्रकरणी अटकेत असलेला आरोपी ऍड. रिझवान सिद्दिकी याला अभिनेता साहिल खान यांचे सीडीआर पुरवल्याचा आरोप आयेशा यांच्यावर आहे. रिझवान याने पोलिसांना चौकशीत खोटी माहिती दिली आहे, असे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

आयशा यांचे अभिनेता साहिल यांच्यासोबत व्यावसायिक संबंध होते.

मात्र, या दोघांमध्ये वाद झाल्याने आयशा यांनी साहिल यांचे सीडीआर बेकायदेशीररीत्या ऍड. रिझवान याला पुरवले होते. त्यामुळे आयशा यांना बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण युनिट एकतर्फे चौकशीसाठी बोलावण्याची शक्‍यता आहे. तसेच, ऍड. रिझवान याचा अटकेत असलेला आरोपी प्रशांत पालेकरसोबत चार वर्षांपासून संबंध असल्याचे त्याच्या संगणक आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारे समोर आले आहे. मात्र, रिझवान याने पालेकर याच्यासोबत सहा महिन्यांपासूनच संबंध नसल्याचे पोलिस चौकशीत सांगितले होते. त्यामुळे रिझवानने पोलिसांना खोटी माहिती दिली, असे त्रिमुखे यांनी सांगितले.

कंगनाही अडचणीत?
अभिनेत्री कंगना रानावत यांनी अभिनेता हृतिक रोशन यांचे सीडीआर बेकायदेशीररीत्या गुप्तहेरामार्फत ऍड. रिझवान सिद्दिकीला पुरवल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती त्रिमुखे यांनी दिली. त्यामुळे कंगना रानावत यांच्याही अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: thane news ayesha shroff inquiry