
firecrackers Illegal sale in Ulhasnagar
ESakal
उल्हासनगर : शहरातील फटाका विक्रेत्यांनी नियम पायदळी तुडवत केलेल्या अवैध फटाक्यांच्या मोठ्या साठ्यामुळे उल्हासनगरमध्ये स्फोट आणि मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी मुरबाड रस्त्यावरील एका फटाक्याच्या गोदामात झालेल्या भयंकर स्फोटात उल्हासनगरातील व्यापारी मनीष नारंगचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरांतील फटाका विक्रेते आणि त्यांच्या गोदामांच्या सुरक्षा व्यवस्थेची स्थिती गांभीर्याने तपासली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.