बारवी धरणग्रस्तांचा अंबरनाथमध्ये ठिय्या! तीन गावांच्या पुनर्वसनाची मागणी

बारवी धरणग्रस्तांचा अंबरनाथमध्ये ठिय्या! तीन गावांच्या पुनर्वसनाची मागणी

अंबरनाथ  : बारवी धरणाच्या विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील तीन आदिवासी पाड्यांचे प्रश्‍न कायम आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

श्रमिक मुक्ती संघटनेच्या ऍड. इंदवी तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली अनंता मेंगाळ, जगन बरतड, यशवंत खंडवी, लक्ष्मण शिद, बुधाजी भंवर, विठ्ठल खंडवी आणि लक्ष्म बांगरा तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणानंतर तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तळ्याच्या वाडीच्या ग्रामस्थांना रस्ता नसल्याने गरोदर महिला, आजारी नागरिकांना कापड्याच्या झोळीमधून रुग्णालयात न्यावे लागते. तळ्याच्या वाडीचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवण्याबाबत एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत; तरीही या गावाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटू शकला नाही. 

कोळे वडखळच्या ग्रामस्थांना इच्छितस्थळी नेण्याबाबत एमआयडीसी प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मुरबाड आणि ग्रामीण भागातून अंबरनाथला आलेल्या आदिवासी बांधवांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी येताना सोबत जेवण बनवण्यासाठी आवश्‍यक वस्तूही आणल्या आहेत. तळ्याची वाडीमधील सर्व आदिवासी बांधवांचे त्वरित पुनर्वसन करावे, वनहक्क मान्यता कायद्यानुसार बाधितांना मोबदला आणि पर्यायी जमिनी द्याव्यात, बाधित होऊनही संपादित न केलेल्या जमिनी संपादित करून त्यांचा मोबदला आणि नुकसानभरपाई त्वरित द्यावी आदी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 

बारवी धरण प्रकल्पातील 1972 पासून टप्प्याटप्प्याने बाधित झालेले प्रकल्पग्रस्त असलेल्या तीन गावांचे अद्यापि पुनर्वसन झाले नाही. याबाबत कार्यवाही करण्याचे एमआयडीसीकडून जोपर्यंत लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. 
- इंदवी तुळपुले,
श्रमिक मुक्ती संघटना 

thane news baravi dam victims stay in Ambernath Demand for rehabilitation of three villages

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com