सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका खाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

ठाणे - ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हील हॉस्पिटल) आवारात पार्क केलेल्या जुन्या तीन रुग्णवाहिका व एका टाटा सुमो गाडीने रविवारी दुपारी अचानक पेट घेतल्याने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी २० ते २५ मिनिटांत आग आटोक्‍यात आणली. 

ठाणे - ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हील हॉस्पिटल) आवारात पार्क केलेल्या जुन्या तीन रुग्णवाहिका व एका टाटा सुमो गाडीने रविवारी दुपारी अचानक पेट घेतल्याने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी २० ते २५ मिनिटांत आग आटोक्‍यात आणली. 

रुग्णालयाच्या आवारात भंगारात काढलेल्या जुन्या तीन रुग्णवाहिका व एका टाटा सुमो गाडीला रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाला यासंबंधी कळविले. त्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व एक रेस्क्‍यू गाडी दाखल झाली. अखेर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. 

रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा आहे; परंतु रुग्णालयाच्या आवारातील गाड्यांना लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचेच साह्य आवश्‍यक होते. त्यामुळे त्यांना पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांनी सांगितले. 

अग्निशमन यंत्रणा कुचकामी 
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभ्या गाड्यांना अचानक आग लागल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील छोटी आग विझविण्यासाठी असलेले अग्निशमन यंत्र आणले; परंतु हे यंत्र चालतच नसल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तसेच रुग्णालयाच्या आवारात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्‍यक यंत्रणाही उपलब्ध नसल्याचे दिसून आले. याविषयी ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अग्निशमन यंत्र रुग्णालयात उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. ते यंत्र तपासणीसाठी कार्यालयात आणून निष्कर्ष काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

Web Title: thane news civil hospital ambulance fire

टॅग्स