ठाण्यात काँग्रेसची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

ठाणे - इंदिरा गांधी आणि आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचे चित्रण असलेल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला ठाणे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विरोध दर्शवला. ठाण्यातील कोरम मॉल येथे सकाळी नऊच्या शोदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन निदर्शने केली. हा चित्रपट बंद करण्यात यावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यात काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, बाळ पूर्णेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा ते बारा कार्यकर्ते होते. 

वादग्रस्त चित्रपट ‘इंदू सरकार’च्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठाण्यातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हा चित्रपट कोरम मॉल येथे प्रदर्शित होण्यापूर्वीच बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या जमावाने चित्रपटगृहात घुसून निदर्शने केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या चित्रपटाचा विरोध लक्षात घेऊन या भागात पोलिसांचा अधिक बंदोबस्त असल्यामुळे निदर्शने झाल्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. चित्रपटाचा नऊ वाजताचा शो या प्रकारामुळे उशिरा सुरू झाला, तर त्यानंतरचे शो मात्र सुरू होते, अशी माहिती वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी दिली. 

Web Title: thane news congress demonstrations