ठाण्यात बालकाला विकण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

ठाणे - जांभळी नाका येथील लॉजमधील सहा दिवसांचे बालक दोन लाखांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. बालकाची सुटका करून त्याला डोंबिवली येथील जननी आशीष केंद्रात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी या बालकाची आई सना कुद्दूस शेख (२२), सना रुलआमिन सय्यद (वय ३२), सादिक इक्‍बाल खान (२०) आणि रोहित लक्ष्मण स्वामी ऊर्फ साहील सय्यद (२२) यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

सना शेख हिला पतीने तलाक दिला होता; मात्र ती गर्भवती असल्याने चिंतेत होती. तिच्यावर कर्जही होते. सध्या ती सना सय्यद हिच्याकडे राहत होती. १७ जुलैला तिने कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बालकाला जन्म दिला. कर्जातून सुटका करून घेण्यासाठी हे बालक विकण्याचा निर्णय तिने नातेवाइकांसह घेतला. बालकाच्या विक्रीसाठी तिची ग्राहकांशी बोलणी सुरू होती. जांभळी नाका येथे दोन लाखांना हे बालक विकण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहराचे पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांना मिळाली होती. त्यानुसार मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने बनावट दाम्पत्याला ग्राहक बनवून आरोपींशी बोलणी करण्यासाठी पाठवले; मात्र त्यांनी मध्यस्थांमार्फत चर्चा करण्याची तयारी दाखवून दोन लाखांत सौदा पक्का केला. त्यानंतर हे चौघे बालकाला घेऊन येताच त्यांना पोलिसांनी पकडले. कर्ज फेडण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बालकाच्या आईने सांगितल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.

Web Title: thane news crime