गतिमंद मुलीवर अत्याचार; दोघांना 20 वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

ठाणे - अल्पवयीन गतिमंद मुलीला खाऊचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना ठाणे विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा केली. आरोपींनी केलेला अपराध हा अमानवी, भयानक अत्याचाराचा निंदनीय प्रकार असल्याचे न्यायाधीश ए. एम. भैसाने यांनी शिक्षा सुनावताना म्हटले.

समीन अन्सारी व सोनू मुर्म अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी झारखंड येथील असून, त्यांचा तिसरा साथीदार इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा अद्याप फरारी आहे. पीडित मुलीला तिघा जणांनी खाऊचे आमिष देऊन घरापासून लांब निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केले. घटनेनंतर आरोपी समीन अन्सारी व फरारी आरोपी इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा यांनी पीडितेस जिवे ठार मारण्याचे ठरविले होते; परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इसाक अन्सारी ऊर्फ रेंगा हा अद्याप फरारी असून, पोलिस त्याच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत. मुख्य सरकारी अभियोक्ता संगीता फड यांनी सरकारची बाजू मांडली, तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून फिर्यादीतर्फे ऍड. सुजाता जाधव यांनी सुरवातीपासून प्रयत्न केले.

Web Title: thane news crime