उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांचे डोंबिवलीत निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

ठाणे -  राज्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय म्हैसकर (वय ७८) यांचे बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुधा, वीरेंद्र व जयेंद्र ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

म्हैसकर यांनी सर्वप्रथम कल्याण-शीळमार्गाची दुरुस्ती केली. त्यानंतर त्यांनी आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) ही कंपनी स्थापन करून ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर बांधण्यात आलेला ‘मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे’ या पहिल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठराविक काळात पूर्ण केले. या यशानंतर बीओटी तत्त्वावरील राष्ट्रीय महामार्गांची अनेक कामे त्यांना मिळाली. या कामांमुळे म्हैसकर यांनी उद्योग जगतात नवीन ओळख निर्माण केली. या कामांसाठी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष सहकार्य केले होते. डोंबिवलीतील डोंबिवली जिमखान्याचे ते संस्थापक सदस्य होते. या जिमखान्याचे नाव उंचावण्यात म्हैसकर यांचा मोठा वाटा होता.

Web Title: thane news Dattatray Mhaskar death