
Dombivli Dispute on Diwali Stall
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेला घनश्याम गुप्ते रोडवर दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून परप्रांतीय फेरीवाला महिला आणि श्रीवल्ली फाउंडेशनच्या मराठी महिला यांच्यात वादावादी झाली. फेरीवाल्या महिला जागेवरून हटण्यास तयार नसून फाउंडेशनच्या महिलांना त्यांनी अरेरावी करत मराठी वरून हीनवल्याचा आरोप फाउंडेशनच्या रेखा रेडकर यांनी केला आहे. तसेच त्या महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून रस्त्यावर धिंगाणा घातला. अखेर पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला.