बिनधास्त खा अंडी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कल्याण - प्लॅस्टिकची अंडी, चीनी अंडी, अंड्यात प्लास्टिक निघाले, अशा तक्रारींच्या धर्तीवर अन्न व औषध ठाणे विभागाच्या पथकाने डोंबिवली, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पाहणी करून तीन ठिकाणची अंडी ताब्यात घेतली होती. ती तपासणीसाठी मुंबईतील अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविली होती. त्यांच्या अहवालात काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सांगूनही याबाबतच्या अफवा अद्याप पसरत आहेत. दोन दिवसांपूर्वी अंतिम अहवाल आला असून त्यातही काही आक्षेपार्ह न आढळल्याने नागरिकांनी त्यावर विश्‍वास न ठेवता बिनधास्त अंडी खावीत, असे आवाहन अन्न व औषध कोकण विभाग कोकण सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि वसई-विरारमध्ये प्लॅस्टिक अंडी, चीनी अंडी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अन्न व औषध विभागाच्या कामकाजावर टीका झाली. 

याची दखल घेत सुरेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. विभागाचे ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने १० एप्रिल २०१७ रोजी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, वसई-विरारमधील तक्रारदारांनी दिलेली अंडी आणि त्याने खरेदी केलेल्या दुकानांमधील अंडी ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविली होती. त्याच्या अहवालात काही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह आढळले नव्हते. तसे जाहीर करूनही पुन्हा सोशल मीडियावर प्लॅस्टिक अंड्यांविषयीच्या बातम्यांमुळे खळबळ माजली आहे. त्याचा अंड्यांच्या विक्रीवर परिणाम होत असून याची दखल घेत देशमुख यांनी व्हिडीओद्वारे नागरिकांशी संवाद साधत अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

अंड्यांचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे जाहीर केले होते; मात्र पुन्हा सोशल मीडियावर अफवा पसरवली जात आहे. अंतिम अहवालातही काही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह आढळले नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. काही अडचण असल्यास हेल्पलाइनवर तक्रार करावी.
- सुरेश देशमुख,  सहआयुक्त, अन्न व औषध कोकण विभाग

Web Title: thane news egg FDA