एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात ठाण्यात कामगाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

ठाणे - वातानुकूलित यंत्राच्या (एसी) कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले. ठाण्यातील उच्चभ्रू सिद्धाचल निवासी संकुलाच्या क्‍लब हाउसमध्ये आज सायंकाळी ही घडली. सगीर अन्सारी (वय 21) असे मृत कामगाराचे नाव आहे. वसंत विहार संकुलानजीकच्या सिद्धाचल क्‍लब हाउसमधील पहिल्या मजल्यावर अजित जाधव यांची "दी जिम' नावाची जिम आहे. या जिमच्या वातानुकूलित यंत्राचे कॉम्प्रेसर इमारतीबाहेर आहेत. एसीमध्ये गॅस भरण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास चार कामगार आले होते. ते गॅस भरत असताना स्फोट झाला. त्यात सगीर याचा होरपळून मृत्यू झाला.

ठाणे - वातानुकूलित यंत्राच्या (एसी) कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले. ठाण्यातील उच्चभ्रू सिद्धाचल निवासी संकुलाच्या क्‍लब हाउसमध्ये आज सायंकाळी ही घडली. सगीर अन्सारी (वय 21) असे मृत कामगाराचे नाव आहे. वसंत विहार संकुलानजीकच्या सिद्धाचल क्‍लब हाउसमधील पहिल्या मजल्यावर अजित जाधव यांची "दी जिम' नावाची जिम आहे. या जिमच्या वातानुकूलित यंत्राचे कॉम्प्रेसर इमारतीबाहेर आहेत. एसीमध्ये गॅस भरण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास चार कामगार आले होते. ते गॅस भरत असताना स्फोट झाला. त्यात सगीर याचा होरपळून मृत्यू झाला. या स्फोटात गोलू चौधरी (वय 19), अवनीश मौर्य (वय 24) आणि अंकित सिंग (वय 20) किरकोळ जखमी झाले.

Web Title: thane news explosion of AC Compressor

टॅग्स