फिफाच्या निमित्ताने जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

ठाणे - नवी मुंबई येथे होणाऱ्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तसेच आदिवासी पाड्यांवर शुक्रवारी फुटबॉल किक ऑफ रंगणार आहे. या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. शुक्रवारी हे सामने सर्वत्र रंगणार असून, त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने तयार करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील संघांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात या स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र मिशन १ मिलियन योजनेंतर्गत राज्यभरातील सुमारे ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. त्यानुसार गुरुवारी नियोजन भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील व जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुटबॉलचे वाटप करून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव व उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी हेही उपस्थित होते.

गुरुवारपर्यंत जिल्ह्यातल्या ८५० शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली. स्पर्धेसाठी अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कल्याण, भिवंडी, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या विविध शाळांमध्ये मिळून १०० फुटबॉल मैदाने महाराष्ट्र मिशन १ मिलियनमधील स्पर्धांसाठी तयार करण्यात आली.

क्रीडा विभागातर्फे स्पर्धा 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. १७) १७ वर्षांखालील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. विजयी संघास एक लाख; तर उपविजेत्या संघांना ७५ हजार व ५० हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय संघांना चषकही दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अमृतवाड यांनी दिली. 

Web Title: thane news fifa Football