मुलाखतकारांनी उलगडले भावनिक कप्पे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

ठाणे - कोमसापने शनिवारी (ता.३) घेतलेल्या ‘मुलाखतकारांची मुलाखत’ या कार्यक्रमात मराठीतील आघाडीच्या वृत्तवाहिन्यावंरील सहा वृत्तनिवेदकांनी गप्पांच्या ओघात आपले भावनिक कप्पेही उलगडले; मात्र बातमी देताना भावनेपेक्षा कर्तव्यच महत्त्वाचे ठरते. हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित विविध वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांशी पत्रकार प्रशांत डिंगणकर आणि कवी बाळ कांदळकर यांनी संवाद साधला. 

आपल्या करिअरची सुरुवात कशी झाली, हे सांगताना या सर्वांनीच स्ट्रगलचा आढावा घेतला. रचना विचारे, भूषण करंदीकर यांनी आपण नाटक करता-करता या क्षेत्रात आल्याचे; तर मिलिंद भागवत यांनी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी ते वाहिनीचा प्रतिनिधी असा प्रवास सांगितला. विनायक घोडे यांनी आकाशवाणीपासून पत्रकारितेचा श्रीगणेशा केल्याचे; तर वैभव कुलकर्णी यांनी कॅमेरामन ते ॲन्कर अशी सुरुवात केल्याचे सांगून आपला रंजक प्रवास कथन केला. त्यांनतर रोज बातम्या देताना येणारे अनुभव, रोजच्या धावपळीत कुटुंबाला वेळ देताना करावी लागणारी कसरत उलगडताना साऱ्यांनी अनेक किस्से, गमतीजमती सांगून गप्पांचा फड रंगवला. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी आहे; पण रोजच दहावीची परीक्षा दिल्यासारखे वागायला जमणार असेल, त्यांनीच या क्षेत्रात यावे, असा कानमंत्र त्यांनी दिला.

आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याने मुलांना त्यांच्यामधील दमलेल्या बाबाची कहाणी कथन करावी लागते, तर तुमच्या चॅनेलवर नेहमीच दुःखाच्या बातम्या का दाखवता रे...असा प्रश्‍न मला माझा मुलगा विचारतो त्यावेळी मी निरुत्तर होतो, असे सांगत मिलिंद भागवत यांनी आजच्या परिस्थितीचा मुलांवर कसा परिणाम होतो, हे सांगितले. आपल्या जीवनातील छोटेमोठे प्रसंग सांगता सांगता माध्यमांच्या सद्यस्थितीवर.. भविष्यातील आव्हानांवरही त्यांनी भाष्य केले. श्रोत्यांमधून आलेल्या प्रश्‍नांनाही उत्स्फूर्त उत्तरे दिली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ समीक्षक अनंत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष कवी डॉ. महेश केळुसकर यांच्यासह चित्रकार विजयराज बोधनकर, कवी शशिकांत तिरोडकर, ठाणेभूषण अनंत मेढेकर, गप्पागोष्टीकार जयंत ओक, प्रा. मंदार टिल्लू, कवी प्रशांत मोरे, पत्रकार विनोद जगदाळे, पंकज दळवी आदी उपस्थित होते.

Web Title: thane news konkan marathi sahitya parishad