काट्याचीवाडी परिसरात बिबट्याकडून पुन्हा एक बैल फस्त

file photo
file photo

सरळगाव (ठाणे): मुरबाड तालुक्यातील काट्याचीवाडी (सिंगापूर) येथे पुन्हा बिबट्याने बैल फस्त: केल्याने आदिवासींमध्ये भितीचे वातारण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील काट्याची वाडी (सिंगापूर) येथे बिबट्याने धूमाकूळ घातल्याने या भागात आदिवासीमध्ये भितीचे वातावरण आहे. 28 नोव्हेंबरला पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घराजवळ असलेल्या गोठ्यातील एक बैल फस्त केला. त्यामुळे या परिसरातील आदिवासींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या वावरत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. सह्याद्रीच्या पायथ्या लगत असलेल्या काट्याचीवाडी (सिंगापूर) येथील बारकू गोविंद वाघ या आदिवासी शेतकऱ्याचा या अगोदर एक बैल बिबट्याने फस्त केला होता. आता पून्हा एकदा याच शेतक-याचा दुसरा बैलही बिबट्याने फस्त केल्याचे या  आदिवासी शेतक-याला बैल जोडी राहिली नसल्याने नविन बैल जोडी विकत कशी घ्यायची? याची चिंता लागली आहे.

गेल्या वर्षी दोन माणसांचे बळी घेतल्याने वन विभागाने त्या नरभक्षक बिबट्याला सिंगापूर परिसरात ठार मारले होते. त्याच परिसरात पुन्हा दुसऱ्या बिबट्याने ऑक्टोंबर महिन्यात एक बोकड तर एका बैलाला ठार मारले पाच दिवसातील दुसरी घटना घडली होती. आता 28 नोहेंबरला पुन्हा एक बैल फस्त केल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या परिसरात वन विभागाने पिंजरा लावावे, अशी मागणी सरपंच मनिषा ईष्टे, उपसरपंच नाना वाघ, देवराम वाघ, लिंबा शिद, मारूती पोटे या आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com