

road potholes
ठाणे शहर : हलक्या वाहनांसह जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा घोडबंदर मार्ग अपघातांचे केंद्र ठरू लागला आहे. एकाच वेळी या मार्गावर विविध कामे सुरू असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. अशातच मार्गावरील उड्डाणपुलांच्या चढणीचे ठिकाण जड-अवजड वाहनांच्या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहेत.