गणितपेटीमुळे गणित होणार सोपे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ठाणे - महापालिका शाळांमधील मुलांना गणित विषय अधिक सोप्यारीतीने शिकवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने नवे पाऊल उचलले आहे. त्यासाठी गणितपेटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तिचा वापर होणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील चौथी ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीसाठी दोन गणितपेटी असणार आहेत. यानुसार एकूण एक हजार ५९० गणितपेट्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ८१ लाख ८८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे.

या गणितपेटीत मणी माळ एकक, दशक दांडे, शतक पाटी व हजाराचा घन, नाणी आणि नोटांची पुस्तिका, ठोकळे जोडणे, मॅचिंग सेट, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जीओ बोर्ड, मीटर टेप, पट्ट्या, मणी, दोरी केसांच्या पिन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.

अर्थसंकल्पात महापालिका प्रशासनाने कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून हा खर्च होणार आहे. गणितपेटीची खरेदी निविदा मागवून केली जाणार आहे. 

शाळांत हॅण्ड सॅनिटायझर मशीन
विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर मशीन पुरविले जाणार आहे. हाताला लागलेल्या जंतूमुळे मुलांना आजार होण्याची शक्‍यता असते. स्वच्छतेसाठी पालिकेच्या शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ३३ लाख ७८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिकेतील मुलांसाठी पुढील सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या वस्तू मुलांना मिळणार आहेत.

Web Title: thane news math municipal school