

Illegal Parking
ESakal
टिटवाळा : टिटवाळा गणपती मंदिर रोड मुख्य रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे सातत्याने या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. याबाबत शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेने वारंवार लेखी निवेदन देऊनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.