
मोहिनी जाधव
बदलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात ‘अ’ दर्जाची नगरपालिका असूनही छत्रपती शिवाजी महाराज नगर वसाहतीतील पाचशेहून अधिक लोकसंख्येला केवळ एकाच सार्वजनिक शौचालयावर अवलंबून राहावे लागत आहे. यात पुरुष व महिलांसाठी केवळ दोनच शौचालय आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. धक्कादायक म्हणजे शौचालयांची सफाई करण्यासाठी पालिकेची कर्मचारीच येत नसल्याचे समोर आले.