विमा नाकारल्याने टपाल विभागाला दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

ठाणे - ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी काढून त्याचे संपूर्ण हप्ते भरून मुदत संपल्यानंतर विमा दावा करणाऱ्या ग्राहकाला रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डाक विभागाला ठाणे ग्राहक मंचाने न्यायिक खर्च आणि नुकसानभरपाईपोटी २० हजारांचा दंड सुनावला आहे. त्याचबरोबर या विम्याचे मॅच्युरिटी मूल्य दोन लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शेवटचा हप्ता भरलेल्या तारखेपासून १२ टक्के व्याजाने तक्रारदाराला देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.  

भिवंडीतील पाच्छापूर येथील एका महिलेने या प्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाच्या अध्यक्ष स्नेहल म्हात्रे यांनी दोन्ही बाजूंची माहिती घेऊन या प्रकरणी निर्णय दिला. तक्रारदार महिलेने २००६ मध्ये येथील ग्रामीण टपाल विभागाच्या कार्यालयात डाक जीवन विमा पॉलिसी काढली होती. त्या पॉलिसीचे तीन हजार ५९२ रुपये हप्ते २०११ पर्यंत पूर्ण भरले. त्यानंतर या विम्याची मुदत संपल्यानंतर विमा रकमेसाठी या महिलेने टपाल विभागाकडे दावा केला. या पॉलिसीची कागदपत्रे हरवल्याचे टपाल विभागाने तिला सांगितले. त्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करून दावा करण्यास सांगण्यात आले. तसे करूनही रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदाराने टपाल विभागाविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार केली. या वेळी विभागाने ही योजना ४४ वर्षांवरील वयातील नागरिकांसाठी नसल्याचे पत्र २००६ मध्ये दिल्याचे स्पष्ट केले. या तक्रारदार महिलेने हे पत्र मिळाल्यानंतर टपाल विभागाकडे कागदपत्रे दाखवली नसल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अमान्य करण्यात आला.

Web Title: thane news post office Insurance

टॅग्स