पावसाच्या माऱ्याने वृक्ष, घरांची पडझड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

ठाणे - ठाण्यातील वाढत्या पावसाच्या माऱ्यामुळे गुरुवारी ठिकठिकाणी झाडे आणि घरांची पडझड होऊन तीन जण जखमी झाले. कार आणि घरांवर पडलेल्या वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ठाण्यातील गणेशवाडी परिसरातील खाडे चाळीवर झाड पडल्याने या चाळीतील सुरेखा खाडे (वय ६५) जखमी झाल्या; तर मुंब्रा बायपास रस्त्यावर घराची भिंत कोसळून अखिलेश शर्मा (२६) तरुण जखमी झाला आहे. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने धोकादायक इमारती आणि बांधकामे रिकामी करून तोडून टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसामुळे कोपरी पुलाच्या बाजूला असलेली पुलाची संरक्षक भिंतही कोसळल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी असले तरी दुपारनंतर हजेरी लावलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली. शहरात ८५.५० मिमी पावसाची नोंद झाली असून, या काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ५० तक्रारी आल्या. त्यात २३ झाडे पडल्याच्या, तर दोन फांद्या पडल्याच्या घटनांचा समावेश होता. दोन ठिकाणी भिंत कोसळली; तर तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. वर्तक नगर परिसरातील आयटीआय इमारतीच्या परिसरात उभ्या असलेल्या नजीम कुरेशी यांच्या कारवर वृक्ष कोसळून तिचे नुकसान झाले; तर दुपारी ठाणे-पश्‍चिमेकडील गणेशवाडी येथील खाडे चाळीतील दिनेश खाडे व दिलीप ठाकूर यांच्या घरांवर झाड पडून चाळीतील सुरेखा खाडे या जखमी झाल्या. त्यांना कळव्यातील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंब्र्याच्या टेकडीवरील धोकादायक दर्गा तोडला       
मुंब्रा टेकडीवरील मुंब्रा बायपास परिसरात डोंगरावर झोपड्यांचे प्रमाण वाढले असून तेथे दर्गा उभारण्यात आला होता. जोरदार पावसामुळे या भागातील घराची इमारत कोसळून अखिलेश शर्मा हा तरुण जखमी झाला. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने तेथील धोकादायक घर आणि एक दर्गाही तोडून टाकल्याची माहिती महापालिकेने दिली. शहरात दिवसभर ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

Web Title: thane news rain