धरण क्षेत्रात पातळी कमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

ठाणे - गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा धरण क्षेत्रामध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी "जैसे थे' आहे. गेल्या वर्षीपेक्षा काही भागांमध्ये कमी पातळी असली तरी जुलैमध्ये मोठ्या पावसामुळे धरण क्षेत्र भरून वाहतील, अशी अपेक्षा ठाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जूनचे 22 दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. रात्रीच्या सरींमुळे झरे आणि ओढे खुले झालेले नसल्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी अद्याप कमीच आहे.

ठाणे - गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा धरण क्षेत्रामध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी "जैसे थे' आहे. गेल्या वर्षीपेक्षा काही भागांमध्ये कमी पातळी असली तरी जुलैमध्ये मोठ्या पावसामुळे धरण क्षेत्र भरून वाहतील, अशी अपेक्षा ठाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जूनचे 22 दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. रात्रीच्या सरींमुळे झरे आणि ओढे खुले झालेले नसल्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी अद्याप कमीच आहे. ठाण्यासाठी महत्त्वाचे भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा आणि बारवी या धरणांनीही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. 1 जूनपासून 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

धरण क्षेत्रामध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसाने जोर धरलेला नाही. 22 दिवसांत भातसा धरण क्षेत्रात 363 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आंध्रा धरण क्षेत्र 141 मिलिमीटर, मोडक सागर 204, तानसा 329, बारवी 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाची हजेरी तुरळक असून, पुढील आठवड्यामध्ये पावसाचा जोर वाढला नाही तर पाण्याची पातळी कमी होण्याची शक्‍यता आहे. पावसाची हजेरी रात्री असल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नवे झरे, धबधबे खुले होण्यासाठी आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. ठाणे आणि कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातील पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत असले तरी तेथील पातळी 27 टक्के इतकी शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याची परिस्थिती नियंत्रणात असून, धरण भरण्यासाठी पावसाची दमदार हजेरी अपेक्षित असल्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील धरणातील पाण्याची पातळी 
धरणे शिल्लक पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी 

भातसा 316.83 8.33 

आंध्रा 55.67 16.42 

मोडक सागर 29.4 22.81 

तानसा 29.61 20.41 

बारवी 64.85 27.82 

Web Title: thane news rain dam