ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच

दीपक शेलार
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज (बुधवारी) ठाण्यातील बहुतांश शाळांनी सुटटी जाहीर केली. शहरात 13 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्याने नागरीकांनी 29 ऑगस्टच्या पुनरावृत्तीचा धसका घेतला.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तब्बल 17 वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. माजीवडा, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात वृक्ष वाहनांवर कोसळुन तिघेजण जखमी झाले.

ठाणे : ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच असुन मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली.

वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज (बुधवारी) ठाण्यातील बहुतांश शाळांनी सुटटी जाहीर केली. शहरात 13 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्याने नागरीकांनी 29 ऑगस्टच्या पुनरावृत्तीचा धसका घेतला.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तब्बल 17 वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. माजीवडा, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात वृक्ष वाहनांवर कोसळुन तिघेजण जखमी झाले. तर, पोखरण रोड नं. 2 परिसरात भलामोठा वृक्ष, घरांसह वाहनावर कोसळल्याची घटना घडली.

दरम्यान, पूर्व द्रुतगती महामार्गावर भास्कर कॉलनी परिसरा शेजारील रस्त्यावरील भल्या मोठ्या होर्डींगचा पत्रा जोरदार वादळवाऱ्याने फाटुन धोका निर्माण झाला होता. सुदैवाने, स्थानिक समाजसेवक राजेश मढवी यांनी मध्यरात्रीच धाव घेवुन रहिवाश्यांना दिलासा दिला. त्यानंतर सकाळी अग्नीशमन दल व मनपा आपत्कालीन पथकाने होर्डीगचा पत्रा कापुन काढल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.

Web Title: Thane news rain in Thane