
Rice Farming
ESakal
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाऊस परतल्यास शेतकऱ्यांच्या भातकापणीला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. पावसाने जोर कायम ठेवला, तर भातकापणीवर थेट परिणाम होऊन उत्पादन व उत्पन्न कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.