

Shahad Flyover Traffic Closed
ESakal
उल्हासनगर : अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर कल्याण-मुरबाड महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामाला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक विभागाचे अधिसूचनेनुसार वाहतूक बंदीची अंमलबजावणी करण्यात आली आणि काही मिनिटांतच यंत्रसामग्री, कामगार आणि अभियंते युद्धपातळीवर कार्यरत झाले.