विकासाच्या श्रेयावरून चढाओढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

ठाणे - राज्य स्तरावर विकासकामांच्या उद्‌घाटनामध्ये भाजपकडून शिवसेनेला बाजूला सारले जात असताना, हाच कित्ता शिवसेनेने ठाण्यात गिरवण्यास सुरुवात केली असून ठाण्यातील विकास कामांच्या उद्‌घाटनापासून भाजपला दूर ठेवण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. वागळे इस्टेटमधील  रस्त्याच्या भूमिपूजनापासून भाजपच्या स्थानिक नगरसेवकांना दूर ठेवल्याची चर्चा आहे.

वागळे इस्टेट भागातील तीन रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीने काम करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन नुकतेच झाले. या सोहळ्याला भाजपच्या स्थानिक नगरसेवकांची संख्या अधिक असतानाही शिवसेनेच्या मंडळींनी हा कार्यक्रमच हायजॅक केल्याची चर्चा आहे. वागळे इस्टेट भागातील रस्ते यूटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार करण्यात येणार असून यात वागळेचा मुख्य रस्ता क्रमांक ३३, ३४ आणि रोड नंबर २२ या तीनही रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या वेळी स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते. प्रत्यक्षात या भागात शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक असून भाजपचे विलास कांबळे, सुवर्णा कांबळे आणि केवलादेवी यादव हे तीन नगरसेवक आहेत. हा कार्यक्रम पालिकेचा असल्याने पालिकेने या नगरसेवकांनाही निमत्रंण देणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी निमत्रंण दिलेच नसल्याची माहिती भाजपच्या नगरसेवकाने दिली; त्याच वेळी शिवसेना नेत्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास मात्र यातील कोणीही नगरसेवक तयार नसल्याचे कळते.

भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न
 महापालिकेत अनेक वेळा भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. या कोंडीला अशा प्रकारे विकास कामांच्या उद्‌घाटनापासून भाजपला दूर ठेवून शिवसेनेने आपल्या परीने उत्तर देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. तर या प्रकारानंतर भाजपकडून चोख उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: thane news shiv sena bjp