कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली असून या प्रकरणी फेकून जाणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिखली भागात ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास कल्याण कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर कचरा टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना एका पिशवीत नवजात मुलगी आढळून आली. त्यावेळी काही भटके कुत्रे या बाळाच्या आसपास फिरत होते..Navi Mumbai: कोंडीमुक्त नवी मुंबईसाठी नवे धोरण लागू! बेशिस्त पार्किंगला चाप बसणार, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई.दरम्यान, कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा यांनी तातडीने मुलीला उचलून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. तसेच नवजात बाळाला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून काही काळ तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे..Navi Mumbai: सहाय्यक आयुक्त पदभरतीत गोंधळ! क्लिष्ट पॅटर्न लागू, अभ्यासक्रम बदलल्याने परीक्षार्थी संतापले.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.