अपघातग्रस्त दुरांतो एक्सप्रेसच्या मदतीला ठाणे जिल्हा प्रशासन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

- अपघातस्थाच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स
- एसटीच्या बसेवेमुळे प्रवाशांची गैरसोय टळली

ठाणे: दुरांतो एक्सप्रेसचे ९ डबे इंजिनासह घसरल्यानंतर अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन धावले असून, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्सची सेवा पुरविण्यासोबतच कल्याण एसटी डेपोतून मुंबई, शहापूर आणि नाशिकसाठी त्वरित बसेसची व्यवस्था केल्याने अडकलेले प्रवासी मार्गस्थ झाले आहेत, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

आज (मंगळवार) सकाळी साडेसहाच्या दरम्यान आसनगाव आणि वासिंदच्या दरम्यान वेहळोली गेट जवळ नागपूरहून मुंबईला येणाऱ्या 'दुरांतो एक्स्प्रेस'चे डबे घसरले. अपघाताची माहिती लोको चालकाकडून कळताच आसनगाव रेल्वे स्टेशन मास्टर कडून मदतीसाठी लगेच तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. आसनगाव व शहापूरहून त्वरित उपलब्ध प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सहायक यांनी अपघात स्थळी पोहचले. भिवंडी प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे आणि शहापूर तहसीलदार बाविस्कर यांनी देखील अपघातस्थळी धाव घेतली. प्रवाशाना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे काम परिसरातील गावकऱ्यांच्या माध्यमातून सुरु असतांना कल्याण एसटी डेपोतून १० एस टी बसेसची सोय करण्यात आली. याशिवाय केडीएमटीच्या ६, जिंदाल कंपनीच्या २, खाजगी ५ अशा २३ बसेसची सोय करण्यात आली व या बसेसनी सर्व प्रवासी रवाना झाले असे प्रांत अधिकारी डॉ. थिटे यांनी सांगितले. या वेळी १० रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहचल्याने किरकोळ जखमींना तात्पुरते उपचार करून त्यांना धीर देण्यात आला. २५ खासगी कार्स, टेम्पो यांची देखील या कामी मदत घेण्यात आली.

जीव वाचला हे सुदैव...
अपघाताची तीव्रता पाहता जीव वाचला हे आपले सुदैवच आहे. पण, अवघ्या तासा दोन तासांत मदत मिळाल्याने लगेच सुटका झाली, असेही प्रवाशांनी बोलताना सांगितले. विशेषत: बसेस वेळेवर आल्याने पावसाचा जोर वाढण्यअगोदर आम्ही मुंबईकडे रवाना होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: thane news Thane District Administration help of Durant Express accident