ठाणे, तुला टीएमसीवर भरोसा नाय का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

ठाणे - ठाण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी (ता. २१) अभिनव संगीत आंदोलन केले. 

कळवा येथील पारसिकनगर गणेश घाट परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांतच टेबल मांडून चौपाटी उभारून रेडिओ जॉकी मलिष्काच्या व्हायरल गीतावर गाणे गात पालिकेचा आणि पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आंदोलनानंतरही संबंधितांना जाग आली नाही, तर मनसे स्वत: खड्डे बुजवणार असल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

शहरातील काही भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कळवा-मुंब्रा भागात रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहराची ओळख खड्ड्यांचे शहर अशी होऊ लागली आहे, असा आरोप मनसेने या वेळी केला. कळवा-मुंब्य्रातील हे रस्ते महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्याने रस्त्यावरील खड्डे कोणी बुजवायचे यावरून आधीच वाद सुरू असताना पारसिक रेतीबंदर येथील खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी मनसेने अभिनव आंदोलन छेडले. या वेळी मनसैनिकांनी फलक झळकवत खड्ड्यांतच टेबल मांडले. ‘ठाणे, तुला टीएमसीवर भरोसा नाय का?’ असे गीत गायले. 

Web Title: thane news TMC MNS