टीएमटीच्या कारभारावर संगणकाची नजर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

ठाणे - टीएमटीच्या दैनंदिन कार्यशैलीवर नजर ठेवण्यासाठी आता थेट संगणकाची मदत घेतली जाणार आहे. परिवहनची कार्यशाळा, बस दुरुस्तीसाठी आलेले सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका ईआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) ही संगणक प्रणाली लागू करणार आहे. टीएमटीच्या सर्व यंत्रणांना संगणकाद्वारे जोडण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ५० लाखांचा खर्च केला जाणार आहे. ठाणे परिवहन सेवेत सध्या ३५० हून अधिक बस कागदावर दाखल आहेत; परंतु जीसीसी ठेकेदार वगळता परिवहनच्या स्वत:च्या केवळ ९० बस रस्त्यावर धावतात. सध्या ठेकेदार व परिवहन सेवेच्या मिळून २७० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यशाळेच्या कामावर कायम टीका होते; मात्र किती साहित्य आले, किती वापरले गेले, टायर किती आले, स्पेअरपार्टस्‌ कती आले, कोणता कर्मचारी कामावर आला व कोणता गेला, बस वेळेवर का धावत नाही, बसेस दुरुस्तीसाठी केव्हापासून आगारात उभ्या आहेत, किती वेळेत त्या दुरुस्त होणे अपेक्षित आहे, याची थेट माहिती एकाच वेळी उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर तेथील कर्मचाऱ्यांवर थेट नियंत्रणही नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून परिवहनला शिस्त लावण्यासाठी पालिकेकडून या प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरू होता; परंतु निधीअभावी हे काम पालिकेला करता येत नव्हते. 

अखेर आता दोन वर्षांनंतर पालिकेने परिवहनच्या कारभाराला अंकुश लावण्यासाठी ईआरपी प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या प्रणालीचा यशस्वी वापर नवी मुंबई परिवहन सेवेने केला आहे. त्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेतही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार परिवहनचा सर्व कारभार आता संगणकीकृत करण्यात येणार असून, साहित्याचा लेखाजोखा मिळणार आहे.

एका क्‍लिकवर माहिती
बसेसची वेळेत दुरुस्ती झाली का, कर्मचारी किती वाजता आला, किती वाजता गेला आदींसह सर्व माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कमांड सेंटरदेखील उभारण्यात येणार असून, त्या माध्यमातून सर्व डेटा सेव्ह केला जाणार आहे.

Web Title: thane news TMT