टीएमटीची आगारे भंगारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

ठाणे - ठाणे महापालिका परिवहन सेवेची (टीएमटी) दैनंदिन उलाढाल वाढली असली तरी टीएमटीची आगारे मात्र भंगार बनली आहेत. टीएमटीच्या वागळे इस्टेट आणि कळवा आगाराची दुरवस्था झाली आहेच; किंबहुना नव्या कोऱ्या वातानुकूलित बससाठी उभारण्यात आलेल्या मुल्लाबाग आणि आनंदनगर आगारातही सुविधा नसल्याचे समोर आले आहे. आगारात साधे फलकही नाही, तर बसना इंधन भरण्यासाठी थेट वागळे आगार गाठावे लागत असल्याने या द्राविडी प्राणायामामुळे इंधन आणि वेळेचाही अपव्यय होत आहे. कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त ड्युटीचा भार पेलावा लागत आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नाने पालिकेची परिवहन व्यवस्था नुकतीच हळूहळू रुळावर येत असताना, दुरवस्था झालेल्या आगारांमुळे टीएमटीला तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे एकाही परिवहन अधिकारी किंवा महापालिकेचे लक्ष नाही, असा आरोप कर्मचारी करत आहेत. 

लोकमान्यनगर येथे टीएमटीची चौकी असून इथे कर्मचारी विश्रांतीसाठी व जेवण करण्यासाठी थांबतात; परंतु या चौकीचे छत कधी अंगावर पडेल हे सांगू शकत नाही. इतकी या विश्रांतिगृहाची अवस्था दयनीय बनली आहे. याठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. स्वच्छतागृह अतिशय घाणेरडे आहे. हीच अवस्था कोपरी येथील चौकीची आहे. 
- संजयकुमार आव्हाड, टीएमटी कर्मचारी 

टीएमटीच्या व्यवस्थापकांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. मुल्लाबाग येथील डिझेल पंपाचे काम अपूर्ण आहे. टीएमटीच्या आगारांचे काम सुरू असून भविष्यात सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. 
- प्रकाश पायरे, परिवहन समिती सदस्य  

Web Title: thane news tmt bus