ठाणेकर पाच तास कोंडीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

ठाणे - मुंबई-अहमदाबाद मार्गानजीक घोडबंदर रोडवर वर्सोवा परिसरात गॅसने भरलेला टॅंकर गुरुवारी दुपारी उलटला. यात मुंबई, अहमदाबाद व ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. 

एलपीजीने भरलेल्या टॅंकरचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. या दरम्यान वाहतूक बंद होती. ठाणे ग्रामीण पोलिस व मिरा-भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दलाचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उरण बीपीसीएल कंपनीचे पथक पाच तासांनंतर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यामुळे सलग सुटीनिमित्त मुंबईसह ठाण्याबाहेर जाणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. 

गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता एलपीजी टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. त्यानंतर गॅसगळतीची शक्‍यता लक्षात घेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी हा परिसर वाहतुकीसाठी बंद केला. वाहतूक पर्यायी दिशेने वळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. या वेळी नवी मुंबई, ठाण्याकडून अहमदाबाद व वसईकडे जाणारी वाहने भिवंडी मार्गाने वळवली. भिवंडी बायपास मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंब्रा बायपास बंद केला. यामुळे ठाण्याकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसला.

Web Title: thane news traffic