esakal | ठाणेकरांनो उद्या लसीकरणाला जाण्याआधी ही बातमी एकदा वाचाच

बोलून बातमी शोधा

corona vaccination
ठाणेकरांनो उद्या लसीकरणाला जाण्याआधी ही बातमी एकदा वाचाच
sakal_logo
By
दीनानाथ परब

ठाणे: ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी उद्या म्हणजे गुरुवारच्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्राची दिवसाला सहालाखापर्यंत लसीकरण करण्याची क्षमता आहे. पण तितक्या प्रमाणात लसी उपलब्ध होत नाहीयत. राज्याच्या वेगवेगळया भागातून लसींची कमतरता निर्माण झाल्याच्या बातम्या येत असतात. नागरीक लसीकरणासाठी येतात. पण पुरेसा लसींचा साठा नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागते.

ठाण्यातही लसींबाबत फार वेगळे चित्र नाहीय. बुधवारी ठाणे महापालिकेच्या केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार नाहीय. लसींचा साठा संपल्यामुळे ठाणे महापालिकेच्या केंद्रांवर उद्या लसीकरण होणार नाही असे टि्वट नरेश म्हस्के यांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आपले टि्वट टॅग केले आहे. आमची तयारी पूर्ण आहे ,फक्त आता तुम्ही कमी पडू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

२ लाख २४ हजार ठाणेकरांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. ६१ हजार ठाणेकरांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मागच्या काही दिवसात ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. पण आता रुग्णसंख्या कमी होतेय. पण मृत्यू दर वाढला आहे. माजिवाडा, मानपाडा, नौपाडा, कोपरी आणि वर्तक नगर या भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेत.

हेही वाचा: कोरोना लाटेमुळे सिंहांचा मुंबईतील प्रवेश लांबणीवर