esakal | कोरोना लाटेमुळे सिंहांचा मुंबईतील प्रवेश लांबणीवर

बोलून बातमी शोधा

lion
कोरोना लाटेमुळे सिंहांचा मुंबईतील प्रवेश लांबणीवर
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईत सिंहाचा प्रवेशही लांबणीवर पडला आहे. परराज्यांमधून मुंबईत सिंहाच्या दोन जोड्या आणण्यात येणार होत्या. मात्र, आता पावसाळ्यानंतर सिंहाना मुंबईत आणण्याचा विचार महानगर पालिका करत आहे. भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात गुजरात जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयात तसेच इंदोर येथील प्राणीसंग्रहालयातून सिंहाच्या दोन जोड आणण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

त्याच बरोबर इंदौर मधून कोल्हा आणि अस्वलाची जोडी आणण्यात येणार आहे. त्यासाठी दोन प्राणीसंग्रहालयांना झेब्राची जोडी देण्यात येणार आहे. ही जोडी महानगर पालिका परदेशातून विकत घेणार आहे. फेब्रुवारी महिन्यात यासाठी महानगर पालिकेने निवीदाही जाहीर केल्या होत्या. या प्रक्रियेसाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानेही परवानगी दिलेली असल्याने कागदोपत्री प्रक्रिया सुरुही झाली होती. मात्र,कोविड मुळे या सर्व प्रक्रियेला खीळ बसली आहे.

हेही वाचा: मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर

या प्राण्याचे पिंजरे बांधून पूर्णही झाले आहेत. मात्र,आता पावसाळ्यानंतरच या प्राण्यांना मुंबईत आणण्याचा विचार प्राणीसंग्रहालय प्रशासन करत आहे.या वृत्ताला प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले.या नंतरच्या टप्प्यात राणीच्या बागेत झेब्रा,जिराफ,चिंपांझी,कांगारू असे परदेशी प्राणी आणण्यात येतील, तर,भारतातून नामशेष झालेला चित्ताही राणीच्या बागेत पाहाता येणार आहे.

दोन महिन्यात पुन्हा बंद

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी 22 मार्च पासून राणीची बाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर 15 फेब्रुवारी पासून पुन्हा राणीची बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर नियमावली लागू झाली. त्यामुळे पुन्हा 5 एप्रिल पासून राणीबाग पर्यटकासाठी बंद करण्यात आली.