
Latest Thane news: ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईत तीन दिवसांत २०२ तळीरामांवर कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा दिला आहे; मात्र तळीरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कारवाई आणखी कठोर करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ठाणे वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. २६, २७ आणि २८ डिसेंबर या तीन दिवसांत वाहतूक पोलिसांनी २०२ तळीरामांना कायद्याचा दणका दिला आहे.