esakal | लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....}

कोलशेत खाडीनजीक वापी येथून आलेल्या ट्रकमधून गुटख्याच्या गोण्या छोट्या टेंपोमध्ये भरताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी छापा मारून तीन जणांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 लाखांच्या गुटख्यासह दोन वाहने व तीन मोबाईल असा सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....
sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थाचे सेवन, विक्री तसेच वाहतुकीवर बंदी घातली आहे. तरीदेखील गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरु आहे. ठाण्यातील कोलशेत, तरीचा पाडा, स्मशानभूमीजवळील गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ट्रकमधून गुटख्याच्या गोण्या छोट्या टेंपोमध्ये भरण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक संदीप बागुल यांना शनिवारी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळी छापा मारून दोन्ही वाहनांसह 15 हजारांचे 3 मोबाईल व 20 लाख 91 हजार 320 रुपये किमतीचा गुटखा असा एकूण 33 लाख 06 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

कोलशेत खाडीनजीक वापी येथून आलेल्या ट्रकमधून गुटख्याच्या गोण्या छोट्या टेंपोमध्ये भरताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी छापा मारून तीन जणांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 लाखांच्या गुटख्यासह दोन वाहने व तीन मोबाईल असा सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना ठाणे न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच घोडबंदर रोडवर एका ट्रकमध्ये साडेनऊ लाखांचा गुटखा खंडणी विरोधी पथकाने पकडला होता.

राज्यात खासगी बसवाहतूक सुरु, मग एसटीची वाहतूक बंद का?

याप्रकरणी,ट्रकचालक धर्मराज तिवारी (27) रा.वापी, गुजरात, टेंपोचालक शंकर गुप्ता (20) रा.अंजूरफाटा,भिवंडी आणि पिंटू विश्वकर्मा (31) रा. इंदिरानगर,वागळे इस्टेट या तिघाना अटक केली. गुजरातच्या वापी येथून आणलेला हा गुटखा ठाणे, मुंबई व इतरत्र पुरवठा केला जाणार होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास सोनवणे करीत आहेत.

मिठीबाईच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार...

गुटखा तस्करीचे 'वापी' कनेक्शन
महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थावर सरकारची बंदी असली तरी शेजारील गुजरात राज्यात यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे वापी येथून गुटख्याची तस्करी होत असते. आठवड्याभरापूर्वीही वापी येथील ट्रकचालकाला ठाणे पोलिसांनी अटक करून लाखोचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा वापी येथीलच चालक पोलिसांच्या तावडीत सापडल्याने गुटखा तस्करीचे 'वापी' कनेक्शन समोर आले आहे.