खासगी बसवाहतूक सुरु, मग एसटीची वाहतूक बंद का? 

खासगी बसवाहतूक सुरु, मग एसटीची वाहतूक बंद का? 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेल्वे, खासगी प्रवासी वाहतूक आणि एसटी सेवा बंदचा निर्णय घेतला  मात्र, सध्या खासगी बस वाहतूकदारांकडून सर्रास प्रवाशांची आर्थिक लूट करत प्रवासी वाहतूक करत आहे. मात्र तरीसुद्धा एसटीची सेवा मात्र बंदच आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने राज्यातील 1 लाख एसटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई उपनगरासह राज्यात खासगी बस वाहतुकदारांकडून प्रवासी वाहतूक सुरू आहे. मनमानी भाडे आकारून प्रवाशांकडून दोन्ही बाजूचे भाडे आकारल्या जात आहे. प्रवाशांचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची ई-पास तयार करत आहे. अनेक वेळा वाहनांमध्ये विना ई-पास प्रवाशांची अवैध वाहतूक सुद्धा केली जात असल्याचे आरटीओ विभागाच्या कारवाईत आढळून आल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात बेधडक खासगी बस वाहतूकदार प्रवासी वाहतूक करत असताना यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर अशा परिस्थितीत राज्य शासनाची हक्काची सार्वजनिक प्रवासी वाहतूक असलेल्या एसटी महामंडळाकडे मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दैनंदिन 22 कोटीचे प्रवासी उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, मिळेल ते काम करण्याचा पर्याय सुद्धा कामगार निवडतांना दिसत आहे. त्यामुळे खासगी बसगाड्या रस्त्यांवर धावत असताना एसटी महामंडळाला परवानगी का नाही ? असा प्रश्न एसटी कर्मचारी संघटना उपस्थित करत आहे.  

कशेडी घाटात वाहनांची वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे धाव...

खासगी बसवाहतुकीवर आशीर्वाद कोणाचा?
राज्यभरात लॉकडाऊन असतांनाही मुंबई ते नागपूर अशा सर्वच मार्गांवर खासगी बस प्रवासी वाहतूक सुरू आहे. मनमानी भाडे आणि येण्या-जाण्याचे भाडे सुद्धा आकारत आहे. प्रत्यक्षात या खासगी बस येतांना आणि जातांना दोन्ही मार्गावरून प्रवासी वाहतूक करत असल्याने या खासगी बस वाहतुकीवर कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल विचारला जात आहे. 

मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

खासगी वाहतुकीमुळेच एसटीचे कंबरडे मोडले आहे. रोज सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान या खासगी बसमुळे होतंय. सरकारने दिलेल्या नियंमांचे पालन करून आज एसटी जिल्हांतर्गत 22 आसनांवर वाहतूक करत आहे. खासगी बसगाड्यांना मात्र काहीच बंधनं नाहीत.
- संदिप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघंटना 

कोरोना संदर्भातले सुरक्षिततेचे नियम घालून सरकारने जिल्ह्याच्या बाहेर वाहतूक करायला एसटीला परवानगी दिली पाहिजे. खासगी वाहतूकदार प्रवाशांना लुटत आहेत. हजारोंच्या संख्येने खासगी वाहने सुरक्षितततेचे नियम तोडून कोकणात गणपती सणाला प्रवासी वाहतूक करत आहे. कर्नाटक, आंध्र, गुजरात,तेलंगणा या राज्यांमध्ये तेथील एसटी जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक करत असताना राज्यातील एसटीला प्रवासाची परवानगी का नाही ? खाजगी वाहतूकदारांशी साटेलोटे असल्याचा संशय येत आहे. 
- श्रीरंग बरगे,सरचिटणीस ,महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेस

राज्यात एसटीला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली नसतांना, खाजगी वाहतूकदारांना मात्र जनतेची आर्थिक लूट करून प्रवासी वाहतूक करीत आहेत यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच एसटीला ई पासधारकांना प्रवास करण्यासाठी नियमांचे बंधन घालून परवानगी द्यावी.
- मुकेश तिगोटे,  सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

खासगी बसमध्ये प्रवाशांना ई-पास घेतल्या शिवाय प्रवास करता येत नाही. जिल्ह्याच्या बाहेर जात असल्यास बसेस ई-पास काढून जातात, एसटीमध्ये मात्र, तसे शक्य नाही. त्यामुळे सध्या एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ

---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com