ठाणे : थर्टीफर्स्ट पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

दीपक शेलार  
सोमवार, 24 डिसेंबर 2018

ठाणे - थर्टीफर्स्ट अर्थात नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील निसर्गरम्य येऊर आणि उपवन परिसरावर पोलिसांची करडी नजर आहे. सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर येथील 265 हॉटेल व बंगलेधारकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 68 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार, अवैध पद्धतीने मद्यविक्री आणि डीजे पार्ट्यांवर बंदी घातली असून बंगले भाड्याने देण्यावरही रोक लावली आहे.

ठाणे - थर्टीफर्स्ट अर्थात नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील निसर्गरम्य येऊर आणि उपवन परिसरावर पोलिसांची करडी नजर आहे. सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर येथील 265 हॉटेल व बंगलेधारकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 68 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार, अवैध पद्धतीने मद्यविक्री आणि डीजे पार्ट्यांवर बंदी घातली असून बंगले भाड्याने देण्यावरही रोक लावली आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तळीरामांच्या उत्साहावर विरंजण पडले असून बंगलेधारक आणि हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांनी येऊर व उपवन परिसरातील 258 बंगले व सात हॉटेल्स व रिसॉर्ट्सना नोटिसा बजावल्या आहेत.

ठाणे शहराच्या कुशीत हिरव्यागार टेकडीवर वसलेला निसर्गरम्य येऊर परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. येऊरचा परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हा परिसर सायलेन्स झोन (शांताताक्षेत्र) घोषित करण्यात आला आहे. तर, तलावामुळे उपवनही पार्ट्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनले आहे. त्यामुळे, नववर्ष स्वागताचे निमित्त साधत हजारो ‘तळीराम’ पर्यटक दरवर्षी 31 डिसेंबरला याठिकाणी आपला मोर्चा वळवतात. दारू पिऊन धिंगाणा घालणे तसेच, मोठमोठ्या आवाजात बंगल्यात, हॉटेलच्या आवारात डीजे, गाणी लावून थर्टी फर्स्टचे‘सेलिब्रेशन’ करण्याचा ट्रेंड अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र, वनविभाग, स्थानिक पोलिस, राज्य उत्पादन शुक्ल विभागासोबत स्वयंसेवी संस्थांनीही तळीरामांची नाकेबंदी करण्यासाठी कंबर कसल्याने यंदा जल्लोष थंडावणार आहे.

येऊरच्या जंगलात पायी गस्त
पाटर्यासाठी येऊरमधील बंगले भाड्याने घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तेव्हा, अशा बंगले भाड्याने देणाऱ्यांना नोटीसा बजावल्या असल्याने अनेकजण अन्य पर्यायांच्या शोधात असतात. तेव्हा, बंगले मिळत नसल्याने जंगलात अथवा मोकळ्या जागी पार्ट्यांचे बेत आखल जातात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी येऊरच्या जंगलात पायी गस्तदेखील घातली जाणार आहे.

सेलिब्रेशनला विरोध नसून धाडधिंगाडा न घालता सामाजिक भान जपले पाहिजे. शांतताक्षेत्र असल्याने डीजे आणि स्पिकरला बंदी घालण्यात आली असून, गैरप्रकार करणा:यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. काही अधिकृत हॉटेल वगळता अनेकांनी या कालावधीत हॉटेल्स व बंगले बंदच ठेवणार असल्याचे सांगीतले असले तरी, पाटर्य़ामध्ये गैरप्रकारसमोर आढळल्यास आयोजकांसह बंगलेधारकांवर कारवाई केली जाणार.

Web Title: Thane: Police look on Thirty First parties