पॅन्ट काढली अन् गुप्तांगात..., पूर्णेकर समर्थकांना पोलिसांची थर्ड डिग्री; अमानुष मारहाण करत अपमानास्पद कृत्य करायला लावलं

Thane Police: पूर्णेकर समर्थकांना पोलिसांनी अमानुष मारहाण करत अपमानास्पद कृत्य करायला लावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
Pradeep Purnekar Case

Pradeep Purnekar Case

ESakal

Updated on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्यात तरुणांना थर्ड डिग्री देण्यात आली. तसेच अपमानास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

Loading content, please wait...