Thane Politics: अंबरनाथमध्ये अदानींचा फोटो घेऊन काँग्रेसचे आंदोलन, नेमके कारण काय?
Ambernath Congress Protest: केंद्र सरकारकडून नवीन आरडीएसएस योजनेअंतर्गत टीओडी मीटर जोडणी सुरू आहे. हे मीटर सक्तीने लावण्यात येत असल्याने याच्याविरोधात काँग्रेसच्यावतीने अंबरनाथमध्ये निषेध आंदोलन करण्यात आला.
अंबरनाथ (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या आरडीएसएस या योजने अंतर्गत टीओडी मीटर जोडणीचे काम सध्या शहरभर सुरू आहे. नागरी आणि रहिवासी सोसायट्यामध्ये हे मीटर जोडणी सक्तीने सुरू असून नागरिकांना मात्र याचा आर्थिक भुर्दंड पडणार आहे.