

Shinde Shivsena Leader Join BJP
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीत भाजपाने शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिंदे सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख विकास देसले यांच्यासह कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.