Thane Politics: ठाकरे गटाने टाकला वेगळाच पत्ता; आता रंगणार कल्याण लोकसभेचा डाव

आता ठाकरे गट याच पत्त्यावर आपला डाव रंगवते की पत्ता फिरवत शिंदे गटासमोर वेगवेगळी आव्हान निर्माण करते हे पहावे लागेल |
Thane Politics kalyan loksabha election
Thane Politics kalyan loksabha election sakal

Kalyan Political News: कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत यांचेच नाव चर्चिले जात आहे. शिंदे यांना प्रतिस्पर्धी म्हणून तगडा उमेदवारास येथे ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात होती. (loksabha 2024)

त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यानावा पासून ते सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, केदार दिघे यांसोबतच सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा होती. ठाकरे गटाने यातील एक पत्ता टाकल्यास कशी लढत द्यायची याची पूर्ण तयारी शिंदे गटाच्या सोशल मिडीयाने केली होती. मात्र ठाकरे गटाने वेगळाच पत्ता उघड करत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करत सामान्य चेहऱ्याला संधी देऊ केली आहे.(Subhash Bhoir, Sushma Andhare, Varun Sardesai, Kedar Dighe)

Thane Politics kalyan loksabha election
Loksabha Election 2024 : राजकीय पक्षांचा मोर्चा नवमतदारांकडे ;ओडिशात विद्यार्थी संघटना सक्रिय,विविध उपक्रमांचे आयोजन

या नावाने शिंदे गट देखील आश्चर्यचकीत झाला असून ठाकरे गटाने निवडणूक रिंगणात टाकलेला हा पत्ता खरा की खोटा, ठाकरे गट पुढे काय वेगळा डाव टाकतो का याची देखील चाचपणी शिंदे गटाकडून केली जात असल्याची जोरदार चर्चा कालपासून शहरात रंगली आहे.

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या आमदारांना तिकीट मिळवून देत त्यांना आपल्यासोबत कायम ठेवण्यासोबतच आपल्याच बालेकिल्ल्यातील आपले व मुलाचे स्थानही अबाधित राखण्याचा आटापिटा शिंदे यांच्या कडून सध्या सुरू आहे.

Thane Politics kalyan loksabha election
Loksabha Election 2024 : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

याठिकाणी भाजपकडूनच त्यांची अडचण केली जात असून ठाकरे गट या सर्व गोष्टींचा फायदा उचलू पहात आहेत. खासदार शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार दिला जाईल असे बोलले होते. त्यासाठी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुषमा अंधारे अशा बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा करण्यात आली.

तसेच शिंदे यांच्यावर नाराज असलेले सुभाष भोईर यांचे देखील नाव अग्रस्थानी होते. तसेच केदार दिघे यांच्या नावाची नंतर शक्यता वर्तविली जात होती. आपल्या विरोधात ठाकरे गटाने यापैकी एकास उमेदवारी दिली तर आपण निवडणूकीच्या रिंगणात त्यांना कसे सामोरे जायचे याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. शिंदे गटाच्या सोशल मिडीयाने

वरुण सरदेसाई, केदार दिघे, सुषमा अंधारे यांचा पूर्ण अभ्यास करुन ठेवला होता. कोणत्या वेळी कोणते पत्ते उघडे करायचे याची देखील चाचपणी सुरु झाली होती.

ठाकरे गटाकडून देखील येथे कोणता उमेदवार द्यायचा याचा अभ्यास सुरु होता. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाचा विचार ठाकरे गटाने केला होता. तसेच सुभाष भोईर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होत असताना खुद्द भोईर यांनी या निवडणूकीतून माघार घेतल्याची माहिती ठाकरे गोटातून आली आहे.

Thane Politics kalyan loksabha election
Loksabha Election 2024 : शक्‍तिप्रदर्शन ; विदर्भातून राणा, पाटील,आंबेडकरांनी भरला अर्ज,मराठवाड्यातून कदम, चिखलीकर मैदानात

यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नावाने महिला उमेदवार, एक सुशिक्षित, उत्तम श्रोता व सामान्य स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार ठाकरे गटाने दिल्याचा प्रचार केला जात आहे.

दरेकर यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांत तसेच इतर इच्छुक उमेदवारांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर सध्या उघडपण बोलण्यास कोणी तयार नाहीत. सामान्य चेहरा असला तरी फाजील आत्मविश्वास न बाळगता ठाकरे गटाच्या या नवख्या पत्याला सामोरे जायची तयारी शिंदे गटाने सुरु केल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाने टाकलेला हा पत्ता खरा की खोटा ऐन वेळेला ठाकरे गट आपला पत्ता चेंज करत खासदार शिंदे यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान निर्माण करतील असे जाणकारांचे मत आहे. आता ठाकरे गट याच पत्त्यावर आपला डाव रंगवते की पत्ता फिरवत शिंदे गटासमोर वेगवेगळी आव्हान निर्माण करते हे पहावे लागेल.

Thane Politics kalyan loksabha election
Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू ; देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com