ठाणे : प्रदूषण विभागाच्या वाहनाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : प्रदूषण विभागाच्या वाहनाला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : भारत सरकारच्या प्रदूषण विभागाच्या वाहनाला ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नल येथे अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. आगीत वाहन आणि त्यातील यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

हेही वाचा: इंदापूर : खाजगी वाहन चालकांचा अव्वाच्या सव्वा दर; पोलीसांनी थांबवली लूट

हे वाहन मिरा रोडवरून बाळकुमकडे जात होती. या वेळी वाहनात चालकासह अन्य दोघे होते. वाहन नागला बंदर रोड येथील सिग्नलला येताच गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली आणि अचानक गाडीला आग लागली. या गाडीत ध्वनी व हवेतील धुलीकणाचे प्रदूषण मोजण्याची यंत्रणा होती. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

loading image
go to top