

Adv. Gunratna Sadavarte Aggressive in Purnekar Murder Case; Sizzling Criticism on Rulers Over Cluster Project
Sakal
ठाणे : ठाण्यातील पुर्णेकर हत्याप्रकरणावरून ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "ठाण्यातले नेमके किती रिक्षावाले आज आलिशान बंगल्यांमध्ये राहत आहेत?" असा अत्यंत बोचरा सवाल करत सदावर्ते यांनी या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. पुर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.