Thane Purnekar Case: पूर्णेकर हत्येचा ठाण्यात रस्त्यावर उद्रेक, राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्याने भडका; घोडबंदरसह मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प

Ram Purnekar Detained as Protests Intensify : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात आंदोलन करण्यात आले. राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
Protests over the Purnekar murder case disrupted traffic on Ghodbunder Road and the Mumbai-Nashik Highway in Thane.

Protests over the Purnekar murder case disrupted traffic on Ghodbunder Road and the Mumbai-Nashik Highway in Thane.

esakal

Updated on: 

ठाणे : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्याच्या मागणीवरून ठाण्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. न्यायासाठी आंदोलन करण्यास निघालेल्या राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, जाळपोळीच्या घटनेने तणावात भर पडली आहे. नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतुकीवर उमटले. नौपाड्यात आंदोलन सुरू असतानाच मानपाडापर्यंत त्याची धग पोहोचली. आंदोलकांनी काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येत आंदोलक बाहेर पडल्याने घोडबंदर मार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ठाण्यात भूतपूर्व कोंडी पाहायला मिळाली. संशयितांच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक आक्रमक झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, बुधवारीही याचे पडसाद उमटण्याचीचिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com