

Mumbai Local Train News Closed Door of Staff Special Local at Thane Station Sparks Anger and Commuter Complaints
sakal
मुंबई : लोकलच्या विलंबामुळे फलाटांवर प्रवाशांची गर्दी उसळली असताना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीची विशेष लोकलचे दरवाजे बंद करून चालविण्यात आली. ठाणे स्थानकात प्रवासी लोकलमध्ये चढण्यासाठी धडपडत असताना मोजक्या कर्मचाऱ्यांना घेऊन ही विशेष लोकल पुढे गेली. एका बाजूला सामान्य प्रवाशांची गर्दीतून वाट काढण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे कर्मचारी विशेष लोकलचे दरवाजे बंद असल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.