

Thane Railway station Platform Construction
ESakal
ठाणे : गर्दीने खचाखच भरलेले ऐतिहासिक ठाणे स्थानक नवीन वर्षात मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज होत आहे. येथील धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या विस्तारामुळे ठाणे स्थानकावर १२ ऐवजी १५ डब्यांच्या लोकल गाड्या थांबण्याचा मार्ग मोकळा होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.