
मुंबईसह ,नवी मुंबई ठाणे भिवंडीमध्येही मंगळवार पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. दरम्यान ठाणे आणि डोंबिवलीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात सह अनेक घरांत पाणी शिरले आहे.