Thane: शहापूरात परतीचा पाऊस, वीज पडून एक ठार; पुलावरून पाणी गेल्याने वहातुक ठप्प

Latest Shahapur News: वहातुक ठप्प झाली तर एका वीटभट्टी मजुरावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
Thane: शहापूरात परतीचा पाऊस, वीज पडून एक ठार; पुलावरून पाणी गेल्याने वहातुक ठप्प
Updated on: 

Latest Thane News: रात्रभर विजेच्या कडकडाट कोसळत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी नदी नाल्यावर पाणी आल्याने वहातुक ठप्प झाली तर एका वीटभट्टी मजुरावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

तुते येथील पुलावरून पाणी गेल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात एक मोटारसायकल व चारचाकी वाहन वाहून गेल्याची घटना घडली असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही तर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने व विजेचे पोलही पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.तसेच रात्रभर वीज गायब झाल्याने रहिवाश्यानी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com