

Rapido Service
ESakal
ठाणे शहर : ठाणे शहरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू असून, जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. शासन आणि परिवहन विभागाचा प्रवासी वाहतूक परवाना नसतानाही शहरात बिनधास्तपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. प्रवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत हे बाईकर्स रिक्षाच्या भाड्यापेक्षा दुप्पट, तिप्पट भाडे आकारत आहेत. प्रवाशाला वाहून नेताना त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.